Ad will apear here
Next
‘पुलं’विषयी वेगळी आपुलकी’


‘मी वाचतो भरपूर; पण सर्व लेखकांच्या तुलनेत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे....’ हे विचार आहेत आजच्या पिढीतला अभ्यासू अभिनेता आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकात साक्षात ‘पुलं’चीच भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलेला रंगकर्मी आनंद इंगळे याचे. ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त आनंदनं त्यांच्याबद्दलच्या भावना ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केल्या.
.............
आनंद इंगळे हा पुण्यातला अत्यंत अभ्यासू आणि बुद्धिमान रंगकर्मी. गेल्या काही वर्षांतल्या ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’, ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘नऊ कोटी ५७ लाख’ यांसारख्या अनेक नाटकांतून जबरदस्त अभिनय करणारा हा कलाकार तितकाच विचक्षणी वाचकसुद्धा आहे, हे त्याच्या बोलण्यातून जाणवतं. त्याची वैचारिक जाणीव प्रगल्भ आहे आणि साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत सजग आहे. 

त्याने ‘पुलं’बद्दल व्यक्त केलेले हे विचार त्याच्याच शब्दांत -

माझ्या जगण्यावर ‘पुलं’चा प्रचंड प्रभाव आहे. ‘पुलं’च्या साहित्याचे संस्कार लहानपणापासूनच होत आहेत. अत्यंत निखळ विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य आणि स्वतःवरसुद्धा विनोद करू शकण्याची क्षमता त्यांच्या साहित्यात आहे हे फार मोठं आहे. मी वाचतो भरपूर, खूप पुस्तकं आहेत; पण सर्व लेखकांत ‘पुलं’विषयी एक वेगळी आपुलकी आहे, जवळीक आहे. ‘पुलं’च्या लेखनात ‘बिटवीन दी लाइन्स’ जे असतं, ते खूपच महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ - ‘हल्ली माझा चेहरा पूर्वीसारखा टवटवीत दाखवणारे आरसे मिळेनासे झाले आहेत’ - हे वाक्य. म्हणजे माझ्यामध्ये झालेला बदल अलीकडे मलाही पूर्वीसारखा दिसत नाही, हे सांगणं किती सहज आहे बघा.’ 

चांगल्याला चांगलं म्हणायची सोय आणि वाईटाला वाईट म्हणण्याची मुभा ‘पुलं’च्या लेखनानं आपल्याला दिली आहे. आजकालच्या जगात दुर्दैवाने प्रत्येकाला दुसऱ्याचं म्हणणं पटतच नाही अशी परस्थिती आहे. ‘दुसऱ्याला आपल्याइतकं निर्वेधपणे जगू द्यायला यायला हवं,’ असं पुलं म्हणाले होते ते आजच्या जगात फारच महत्त्वाचं ठरतंय. आणि हे ज्या अशिक्षितांना कळत नाही आणि जे इतरांना भडकावतायत त्यांनी आजच्या काळात ‘पुलं’ असते, तर त्यांनाही मारायला कमी केलं नसतं.

‘पुलं’च्या साहित्याने मला अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून समृद्ध केलंय. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या त्यांच्या पुस्तकाच्या नाट्यरूपांतरात खुद्द त्यांचीच भूमिका साकारायला मिळणं, यापरतं भाग्य ते काय!

(शब्दांकन : प्रसन्न पेठे, व्हिडिओ : स्नेहा कोंडलकर)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZVNBI
Similar Posts
पु. ल. देशपांडे जगभर पसरलेल्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मनापासून अतोनात प्रेम केलं, अशा महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा म्हणजेच ‘पुलं’चा आठ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
... आणि गुगलवर झळकलं ‘पुलं’चं डूडल! पु. ल. देशपांडे... सकल मराठी जनांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारं नाव... आज, अर्थात आठ नोव्हेंबर २०२० रोजी ‘पुलं’ची १०१वी जयंती आहे. त्या निमित्ताने गुगलने ‘पुलं’वर डूडल करून महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला आदरांजली वाहिली आहे. मुंबईतले चित्रकार समीर कुलावूर यांनी हे डूडल साकारलं आहे. गुगलचं हे डूडल भारतात सर्वत्र दिसणार आहे
‘पुलं’ म्हणजे मराठीतले टागोर’ ‘रवींद्रनाथांनी बंगाली साहित्यात जसा सर्वत्र संचार केला, तसा मराठीत ‘पुलं’नी केला आहे. मराठीत ते जवळजवळ गुरुदेवांच्या पदावर पोहचले आहेत, असं ‘गदिमां’नी म्हटलं आहे. ‘पुलं’च्या कामगिरीचा याहून वेगळा काही सारांश सांगता येत नाही,’ अशी भावना पु. ल. देशपांडे यांचे द्विखंडीय समग्र चरित्र लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली
‘माझे जीवनगाणे’ ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language